बाला, लगीन हाये पोराचा,बेंडची सुपारी देतो तुला
शेठ, नाय जमनार, दुसरीकडे जायाचे वाजवायला
लगनाची सुपारी, पान सुपारी, मारायची सुपारी
देव म्हणजे सुपारी, उंबरठ्यावर सुपारी,
आमंत्रण म्हणजे सुपारी,
विडा ऊचलला, त्यातही सुपारी
पुग-फल म्हंजे घडाने येनारे फल
वंशवृद्धी, समृद्धी , मागल्याचा ह्यो फल
गनपतीची पुजा, म्हंजे पुजेत सुपारी
पत्नी वारली, दुर गेली तर
उजव्या कनवटीला बांधली सुपारी
सु+पारी = चांगला गर असलेले फल
शुर्पारक पासून मंग सुपारी
मुंबई जवल ह्याची लागवर समुद्रकिनारी
नालासोपारा गावान लई ही सुपारी
सोपारा वरून शब्द आला सुपारी
(श्रीकाका)
पुरोहिताला कार्यासाठी सुपारी
कार्यानंतर यजमानाला परत देती सुपारी
'श्रेयोदान" संबोधिते प्रजा सारी
आख्या जगान ही सुपारी
ऊष्ण, दमट हवामानान वाढणारी
'''''''
एक कथा पहिल्या सुपारीची
: संयुक्ता मुलगी राजा जयचंदाची
कथा पृथ्वीराजाने संयुक्तेला पळविलेल्या धाडसाची
राजा जयचंद रागावला
खैबर-खिंडीची माहिती दिली मोहम्मद घोरीला
आमंत्रण दिले पृथ्वीराजाला मारण्याला
असा ईतिहासातील पहिल्या सुपारीचा जन्म झाला
पण पृथ्वीराजानेच घोरीला पकडला
घोरी गयावया करता झाला
पृथ्वीराज घोडचुक करता झाला
दिला सोडून घोरीला
संयुक्ताचा विरोध होता सोडण्याला
घोरीने सांगितले डोळे खाली करायला पृथ्वीराजाला
डोळ्यात लागला गरम सळया खुपसायला
स्वाभिमानी राजाला लागली चुक भोगायला
संयुक्तावरही अत्याचार झाला
तीने आणि हजारो राजपुत स्त्रीयांनी
'जोहार' केला
जयचंदाने नदीत झोकले स्वतःला
६५० वर्षे राज्य मुसलमानांचे
हा सगळा घोळ केला
पहिल्या ह्या सुपारीने
विळखा परत ब्रिटीशांचा
कर्करोग भारताला झाला
(कॅप्टन : अजित वडाकायिल....आंतर-जाल)
....
शास्त्रः
कॅन्सर होतो ह्या सुपारीने
....