१०८(एकशेआठ)

जपमाळेत मणी १०८
का घेतात देवांची नावे १०८?
आठ आकडा ईग्रजीत जर लिहिला
आणि त्याला जर आडवा केला
म्हणती इन्फिनिटी त्याला
जॉन वालिसने १६५५ मध्ये शोध लावला 
*
एक : देव एक आहे
शुन्य : तो निराकार आहे
आठ : तो चराचरात आहे, अनमोल आहे, अगणित आहे
**
एक आकडा गोष्ट एक सांगतो
शून्य हे काहीच नाही हे सांगते
आठ सांगतो हेच सर्व आहे, ते अगणित आहे
***
एक एकता सांगतो
शून्य पोकळी दाखवतो
आठ विश्वरुप दाखवतो
****
एक एकटेपण दाखवतो
शून्य निष्कर्ष सांगतो
आठ सर्व मिथ्या हेच सांगतो
*****
१(१)गुणिले२(२)गुणिले३(३)=१०८
हिंदू, बौद्ध, जैन, शिख सारे मानती पवित्र
******
१०८ देव हिंदू मानती
१०८ त्या गोपी
जपमाळेत मणी म्हणून १०८
सुर्य-पृथ्वी, पृथ्वी-चंद्र व्यास बरोबर १०८
वेदातील ऋचांचे पठण १०८ वेळा
*******
अनादिकालीन स्टोनहेंज, पाषाणमंदिर
१०८ फुट त्याचा डाएमीटर
१०८ दाबबिंदू शरीरावर
मुक्तोपनिषदातील उपनिषदे १०८
ऋग्वेदात (१०), यजुर्वेदात (५०)
सामवेदात (१६) आणि अथर्ववेदात (३२)=१०८
*********
जपमाळेतील १०८ मणी
६गुणिले ३गुणिले२गुणिले ३
::
६घ्राणेंद्रियेः द्रुष्टी, ध्वनी, वास, चव, स्पर्श, विचार
३ अवस्थाः भुत, वर्तमान, भविष्य
२ हृदयातील रक्तावस्थाः शुद्ध आणि अशुद्ध
३ भावनेच्या अवस्थाः आवडते, नावडते, दुर्लक्षित
**********
बुद्धाची १०८ पवित्र पावले
एकुण पीठे असती १०८
नेपाळात, मुक्तिनाथ : पवित्र पाण्याचे नळ १०८
२७ नक्षत्रे गुणिले ४ पदे
कर्म, अर्थ, काम, मोक्ष
असती १०८, सांगती उपनिषदे
***********
१+०+८=९
नऊ आकडा नेतो पुर्णत्वाकडे
नऊ सांगतो मुळाशी तु परत येशी
९ गुणिले १२ =१०८
१०८ मर्मे शरीराची
मेरुमणी दाखवितो नवी अभिरुची
देहाबरोबर शुद्धता बांधण्याची
*
असा हा महिमा १०८ आकडयाचा
************