श्रीफ़ळ

महर्षी अष्टावक्र सभेत गेले

सारे विद्वान हसू लागले
अष्टावक्रही हसू लागले
बाह्यरुपाला सारे हसले
आतील सौंदर्य ना बघितले
बाहेरून कठोर आत असतो मृदुकमल
त्यालाच म्हणती नारळ किंवा श्रीफळ
श्री म्हणजे वैभव, सदासर्वकाळ
नारीकेल किंवा नालीकेर 
शुभसुचक हे फळ
बहुप्रसव हे फळ
कण अन कण असतो लाभदायक
मंगलप्रसंगात ह्याचा समावेश प्रत्येक
वेदोत्तर कालात नारळाचा ऊल्लेख
....
नारळाला ब्राह्मण मानण्याचा एक संकेत
शिखानष्ट म्हणून नारळ करू नये म्हणतात
....
प्राचीन मानव देवाला देत असे बळी
विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतील ही वृक्षवल्ली
ऋषीनी ही प्रथा बंद पाडली
बलिदानाला पर्याय नारळ
ही पद्धत तेंव्हापासून पडली
देवतांच्या मुर्तीला लावला सिंदुर
नारळाचे पाणी शिडकावे त्यावर
रक्ताचा भास होतो क्षणभर
अर्धा नारळ द्यावा देवाला
अर्धा प्रसाद न्यावा बरोबर
सारी देवाचीच लेकरे जर असतील
कोणाचा बळी देव कसा मागेल ?
देवीच्या पायाखाली राक्षस असतो
तो रक्त मागत असतो
बळी म्हणे त्याच्यासाठी असतो
अर्धा प्रसाद माणुस खातो
श्रीफळ हा सुचवला पर्याय
हजारो वर्षापुर्वीचा हा निर्णय
बळी अद्याप बंद नाही झाले
माणसाच्या जिभेचे हे राक्षसी चोचले
...
चुंडमुंड दैत्याचा वध झाला
त्यांच्या डोक्याचा संबळ केला
आदिशक्तीपुढे वाजविला
देव नाही रक्ताला चटावलेला
संबळही सोज्वळ बनविला
देअळाचा कळसही 
नारळाकृती बनविला
बारमाही उपलब्ध हे फळ
टीकते हे दीर्घकाळ
शुभशकुन हा सर्वकाळ
श्रीफळ औषधी असते हे वास्तव
सेतू आदिमानव व संस्कृत मानवातील
जोडते असे श्रीफळच असते एकमेव
.....
आतील भागास ईंग्रजीत म्हणती कोप्रा
आणि मराठीत म्हणती खोबरा