आलो विठूराया दर्शनास तुझ्या
असू दे रे कृपा, नित्य तुझी
भव्य तुझी काया, दिव्य तुझे रूप
व्यापले विश्व ज्याने, ते तूच देवा
पंढरीचा नाथ पाहीला म्या डोळा
तरी अंतरंगा, तृप्ती नाही
संत माय-बाप का झाले तुझे भक्त
जाणले मी जाणले, आज देवा
"कृपा करा देवा", पण विचारा कोणती?
आस सावळ्याची, खंडू नये
रचना : रुपेश बक्षी
८४४६३ ७७१८५