बाप

आईचं हृदय ममतेचा, वाहता पाट असतो,
बापाच्या पाठीचा कणा, मात्र कधीही ताठ नसतो।
आयुष्यभर बापाच्या, पाठीला बाक असतो
जगण्याच्या गाडीचं, तो नकळत चाक होतो
सासरी जाताना मुलगी, डोळ्यांत अश्रूंचा पाट वाहतो, 
तेव्हा तरी कुठे बापाचा कणा ताठ असतो?
बाप ताटातलं मीठ असतो
थंडगार पाण्याचा माठ असतो
व्यवहारचातुर्याचा परिपाठ असतो
सुखी आयुष्याची वाट असतो
त्याच्या कष्टाला कधी काठ नसतो।
आपला बाळ, बाप झाल्यावर
आनंदासोबत त्याला थोडं दु:खसुद्धा होतं
आपल्या पाठीवरचा बाक, 
नव्या बापाकडं देऊन, नंतर अचानक कधीतरी
तो जगाच्या बापाकडं निघून जातो..!