स्वच्छता आणि शुद्धता
हेच पाण्याचे मुख्य उपयोग
प्रत्येक धर्मात आणि धार्मिक कार्यात
असतो पाण्याचा सहभाग
हिंदू धर्मात करती आचमन
आचमन सांगते,
काळजी घ्या विचारांची ते बनतील शब्द
काळजी घ्या शब्दांची ते बनतील कार्यकारण
काळजी घ्या कार्यकारणाची ती मग बनेल सवय
काळजी घ्या सवयीची ती बनेल स्वभाव वैशिष्ट्य
काळजी घ्या स्वभाव वैशिष्ट्याची ते बनेल प्राक्तन
काळजी घ्या प्राक्तनाची ते बनेल आयुष्य
बुद्ध धर्मात जलाचे महत्त्व
जल शिकविते,त्याग, शांतता, शुद्धता, स्वच्छता
धर्म सांगतो मनाची शुद्धता
शिकवितो दानशुरता
बुद्धी आणि भाविकता
वज्रायन परंपरेमध्ये
एक कप जल अर्पण्याऐवजी अर्पिती सात कप जल
१) मनः पुर्वक प्रार्थना २)अर्पण(सर्वार्थाने) ३)चुकांची माफी मागणे
४)चांगले वागण्याचे आश्वासन देणे ५)बुद्धाला सतत
साथ देण्यास विनविणे ६)योग्य मार्ग दाखविण्यास विनविणे
७)तन मन धनाने भक्तीत लीन होणे
ख्च्रिश्चन धर्मात म्हणती "होली वॉटर"
धर्मप्रवेश जलप्राशनाने, बाप्तिस्माने
काळ, वेळ, स्थळ, भवतालचे सारे जीव
ह्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा प्राप्त "होली वॉटरने"
शिख आणि हिंदू धर्मही हेच सांगती प्रामुख्याने
अशुद्ध गोष्ट शुद्ध करते हे जल
जल प्रथम जन्मले पृथ्वीवर
नंतर जीवसृष्टी झाली स्थिरसावर
हे जल आहे अतीप्राचीन
४.६बिलीयन वर्षे जुने असे म्हणती काही जण
निरनिराळ्या ग्रहांवर पण आहे पाणी
दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनची कहाणी
वेदात सापडती चार अवस्था जलाच्या
१) अम्भः २)मिरची ३) मर व ४) अप
ह्यात व्यापले लोक चारही
द्युलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, व पाताळ
अम्भः हे रसात्मक तत्त्व
उत्पादनक्षम पाणी म्हणजे ते मर
पृथ्वीतून बाहेर येते ते अप
सर्व औषधांचे निवासस्थान हे पाणी
विश्वाचे कल्याण करणारा तो अग्नी
पाण्यातच वास्तव्य अग्नीचे
सोम हे उत्पादक तत्त्व
अग्नी हे शोषक तत्त्व
ह्यांच्यातून बनले हे जग
रहस्य पाण्यात काही नाही
ज्यात मिसळेल त्याचा रंग घेई
पाणी हे वाहक आहे
त्याच्यावर योगक्रिया करणे शक्य आहे
ते फक्त माऊलींनाच किंवा
योगसामर्थ्य असलेल्यालाच शक्य आहे
(आंतरजाल, धर्मग्रंथ, श्रीकाका, काही स्वःकल्पना)
जे चुक वाटेल ते सारे माझे.
गैरसमज नसावा.