मन आवर मन आवर...
माझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकू नकोस
अशी माझ्या मोहात पाडू नकोस..
हे प्रेम नाही तर काय आहे
भावनांना उचंबळून देऊ नकोस..
मन आवर मन आवर
माझ्या प्रेमात पडू नकोस..
जागेपणी माझीच स्वप्ने
स्वप्नांमध्ये माझीच यादें
अशी आठवणींनी व्याकुळ होऊ नकोस
भावनांना उचंबळून देऊ नकोस
मन आवर मन आवर
माझ्या प्रेमात पाडू नकोस..
नजरेला नजर देऊ नकोस
बोलताना अशी लाजू नकोस
अशी गहिवरून जाऊ नकोस
भावनांना उचंबळून देऊ नकोस..
मन आवर मन आवर
प्रिये,माझ्या प्रेमात पडू नकोस..
सतीश शिंदे.....