चक्र असते योगिक आणि तांत्रिक
उपनिषदात आणि बुद्धापासून उल्लेखित
चक्र म्हणजे गती किवा शक्तीशी संबंधीत
नाडी किंवा वायुशी संलग्न
सुषुम्ना किंवा अवधुती म्हणजे मज्जासंस्थेत मग्न
दोन मार्ग छेदती एकमेकांस तेथेच चक्त उत्पन्न
हिन्दुंची सप्तचक्त पद्धती
बुद्ध तंत्र वज्रायनाची सुरुवात तृतीय नेत्री
हिमालयन बॉन मध्ये वायू पासून सारे ही खात्री
पाश्चिमात्य पण मानती सप्तचक्त पद्धत
सारी चक्रे संप्रेरक स्त्राव-उगमाशी संबंधीत
सहस्ररा, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणीपुरा
स्वाधिष्ठान आणि मुलाधारा असा हा चक्रांचा फेरा
सहस्ररा म्हणजे एक हजार पाकळ्यांचे कमळ
शुद्धीचा ऊच्च अविष्कार
शक्ती आणि शिवाचा हुंकार
समाधी अवस्थेचा झंकार
आज्ञाचक्राच्या दोन पाकळ्या
येथे सुषुम्नेला छेदती इडा पिंगला नाड्या
मध्या असतो जेथे हा जेथे भेटती दोन पापण्या
म्हणून तृतीय नेत्र असे लागले लोक संबोधण्या
विशुद्ध हे गळ्यावरील चक्र
सोळा फिकट निळ्या पाकळ्या
विशुद्धी संवादाचे ऊगमस्थान
मानसिक शांततेचे प्रस्थापन
आध्यात्मिक शक्तीचे संरक्षण
अनाहतचक्र बारा हिरव्या पाकळ्या
छातीवरी ह्याचे स्थान
भावनांची देवाणघेवाण
आणि रक्ताभिसरणाचे नियंत्रण
मणिपुरा दहा पाकळ्या मध्ये त्रिकोण
आतड्यांचे, पचनक्रियेचे संचालन
अन्नाचे शक्तीत रुपांतरण
संवेदनांची देवाणघेवाण
स्वाधिष्ठान सहा पाकळ्यांचे कोंदण
गुह्य भागात ह्याचे कार्यकारण
लैंगिक व मलमुत्रविसर्जनाचा मेळ साधणे
भावनांची सरमिसळ न करता मिसळणे
मुलाधारचक्र चार पाकळ्याचा आधार
कुंडलिनीचे हे निवासस्थान
नियंत्रण साऱ्या संवेदनविश्वावर
साऱ्या शरीरात हीचा वावर
हिंदुमध्ये अजून मानती सप्तपाताळ
अतल, वितल, सुतल, तलातल,
रसातल, महातल आणि पाताल
अशी ही निरनिराळ्या चक्रांची महती
संत योगी ह्यांना होती ही माहिती
तपश्चर्येने ते सारे साध्य करिती
एकेका चक्राची जागृती
हीच समाधीची उच्चतम स्थिती
हे सारे असते शास्त्र अदभुत
जेंव्हा शरीरशास्त्र नव्हते माहित
तरी प्रत्येक संप्रेरकग्रंथी होत्या चक्राने नियंत्रित
ह्या स्थानांच्या जागृतीसाठी
त्या चक्रास नुसते स्पर्शती
तेथे टीळा वा तिलक लावती
त्यांचीही अनन्य असे महती