प्रारंभ होत नाही कशाचाही गणेशाशिवाय
धार्मिक कार्यारंभ होत नाही तिलकाशिवाय
भस्म लाविती शिवभक्त
चंदन लाविती विष्णुभक्त
कुंकूम लाविती देवीभक्त
तृतीय नेत्र ऊघडताच शिवाचे
होते भस्म आध्यात्मिक, आधिदैविक, आणि आधिभौतिकाचे
टीळा लावताना लावती विविध बोटे
कनिष्ठा (करांगुली):मुळाशी वसतो "बुध"(मर्क्युरी)
अनामिका(रिंगफिंगर):मुळाशी वसतो "सुर्य"
मध्यमा (मधले बोट): मुळाशी वसतो " शनि "(सॅटर्न)
तर्जनी (इंडेक्स फिंगर): मुळाशे वसतो "गुरु"(ज्युपिटर)"
अंगुष्ठा (अंगठा) : मुळाशी वसतो "शुक्र"(व्हीनस)
तर्जनी वर्ज्य करिती टीळा लावताना
असे म्हणती बोट हे वापरती निर्देशांना
तसेच दूसऱ्याचे दोष दाखविताना
एकेकाळी म्हणे जातीनिहाय तिलक लाविती
उभी रेष राजतिलकाची, वीरतिलकाची
स्वामिनारायण तिलक इंग्रजी "यु" आकाराचा, मध्ये लाल बिंदू
पंथाप्रमाणे टीळा लावायच्या निरनिराळ्या पद्धती
तेरा ठिकाणे टीळ्याची असती शरीरावरती
सप्तचक्रांच्या स्थानात वसती संप्रेरक ग्रंथी
तेथे टीळा लावून करती वंदन
किंवा स्पर्शाने जागृती
१)सहस्ररा : पिच्यूटरी ग्रंथी, स्थान मुकुटावरती
पुरुष 'शिवा' व स्त्री कुंडलिनी शक्ती
२) आज्ञाचक्रः टीळा लावण्याचे मुख्य ठिकाण
पीनिअल ग्रंथीचे विश्राम धाम
अर्धनरनारीनटेश्वराचे नाम
हाकिनी देवी हे बलस्थान
३)विशुद्ध(द्धी):थायरॉईडशी समांतर
हम हा मंत्र, पंचवक्तशिव राहणार
पाच डोकी, चार हात आणि
शाकिनी देवी हे बलस्थान
४)अनाहतः ग्रंथी असते थायमस
यम आहे मंत्र, देव ईशान रुद्र शिव
काकिनी देवी हे बलस्थान
५)मणिपुराः आयलेटस ऑफ लँगरहँन्स
स्रवतो येथे स्वादुपिंडरस
सम हा मंत्र, बद्धरुद्र हा देव
लाकिनी देवी हे बलस्थान
६)स्वाधिष्ठानः सॅक्रम येथे लैंगिक व प्रजोत्पत्ती
ब्रह्म हा देव,
राकिनी किंवा चाकिनी हे शक्तीस्थान
७)मुलाधारः गोनॅडस, ऍड्रीनल मेड्युलावर नियंत्रण
तीन नाड्या स्वतंत्र येथे होती
येथुनच ऊर्ध्वगतीने जाती
कुंडलिनी येथे घेते विश्रांती
लाम हा मंत्र, गणेश ही देवता
डाकिनी हे शक्तीस्थान
जो करतो ज्या चक्रावरी स्वारी
त्यास प्राप्त होती विद्या सत्त्वरी
इतर मार्गांप्रमाणे टीळा लावणे जरुरी
बोट वापरून ईष्टदेवतेचे
तंत्र सारे ऍक्युप्रेशरचे
यीन- यांगप्रमाणे
नाड्या इडा- पिंगला जागृत करणे
हिंदुप्रमाणे चायनातही बिंदूशास्र हेच
हजारो वर्षांपासून पुर्वज हे जाणते होतेच
..
शास्त्र:
व्यवसाय मुख्य होता शेती
हाताची बोटे सतत जख्मी होती
जंतू मरती हळद कुंकवात बोटे बुडविल्याने
तसेच आज्ञाचक्रास सतत स्पर्श
दोन्ही कामे साध्य होती
त्यासाठीच पटेल अशी योजना होती