तुडुंबला॥१॥
वहाने उदंड
सुटली सुसाट।
चालावया कोठे
आता वाट॥२॥
पादचारी धजूनी
धावला मध्येच।
चालकाचे पायी
कऽऽच्च "ब्रेक"॥३॥
एकमेकाचियां
उद्धरिती कुळां।
माता-भगिनींसी
स्मरुनिया॥४॥
इथे तिथे दिसे
तांबडा बावटा।
खांबी मोठा आणि
गाड्यांमागे।।५॥
उनाड उसळी
गतिरोधकांची।
खड्ड्यांची गणना
कोण करीं॥६॥
प्रदूषण-नियम
कसले तयाला।
सरकारी गाडा
काळ ओकीं॥७॥
गर्दीविना मोठा
एकसंध रस्ता।
राहिला जरिं का
स्वप्निंचा गा॥८॥
"यजा" म्हणें द्यावा
एक तरी आता।
हिरवा कंदिल
चौकामध्यें॥९॥