प्रदक्षिणा

चला समद्यांनी देवाला प्रदक्षिना घाला

अवरा नमस्कार केला आता प्रदक्षिना कं ला?
"प्र" म्हनजे सम्दी पाप नाहिशी व्हतान
"द" मधी व्हतील  साऱ्या ईच्छा पुर्न 
"क्षि" म्हनजे मुक्ती, वापस भेटनार नाही जन्म
"ना"किंवा "णा" म्हनजे ज्ञानाचे प्रसारन
पन मंग डावीकरून उजवीकरे कनाला
ह्याचा पन पुर्वजांनी हाये ईचार केला
उजवी बाजू असते बाला पावित्र्याची
देव उजवीकरून कालजी घेतो भक्ताची
देवाच्या बाजुने येते धन उर्जा
गाभाऱ्यान असतो प्रसन्न वातावरन
मानसाची ऋण उर्जा जाते तेथेच संपून
मध्यबिंदुशिवाय वर्तुल नाही कारता येत
देव हाच मध्यभागी, साऱ्या भक्तांचे हित साधत
जगान कुठंबी गेला तरी
देव राहतो समान अंतरावरी
केंद्रबिंदू देव सतत अस्तो हाकेवरी
कोनी स्वतःभोवती पन प्रदक्षिना घालतो
देहाच्या मध्यभागात देव राहात आसतो
त्याची आठवन व वंदन जो तो करतो
प्रदक्षिणा घालतात पवित्रतेला
प्रदक्षिणा सांगते येणार परत तु येथेच मुक्कामाला
हे माझे, ते तुझे हे हेवेदावे कनाला
प्रदक्षिणा घालशील तर वर्तुलातच ऱ्हाशील
देवाचे स्मरण करशील, तर मध्यबिंदुकडे जाशील
पापे करशील तर वर्तुलाच्या बाहेर जाशील
केंद्राकडे जाशील तर भगवंताशी एकरुप होशील
प्रदक्षिना देते समाधान पुर्नत्वाचे
तरीपन बल देते नव्या प्रवासाचे
उत्तरे सापडल्याने जीवन समाधानाचे
एकवीस प्रदक्षिणा कोणात्याही देवाला आवडती
तरीपण देव नुसत्या स्मरणानेही आनंदती
त्या त्या देवाला मान देण्यासाठी
प्रदक्षिणेची अनुरुप योजना होती