रक्षाबंधन.. रक्षाबंधन ..


रक्षाबंधन... रक्षाबंधन
दोन मनांची अतूट  गुंफण  !

हिरा भाऊ अन् बहीण अंगठी

अंगठीस हो सुरेख कोंदण ! 

मदतीस्तव वा संकटातही

धावे बंधू  करण्या रक्षण !

भावाचा  बहिणीस आधार

द्रौपदीसखा   तो  नारायण ! 

दुजाभाव ना मनांत कोठे

 दोघांचे ते एकच रिंगण !

रक्षाबंधन ... रक्षाबंधन

दोन जिवांचे अतूट बंधन !
 .