तांबुस पिवळ्या तेजोनिधिची
चुल पेटलि नव दिवसची
पळे नि घटका दिन प्रहरची
केली पुर्तता सात्यत्यची
घन गंभिरशा संध्या समयी
नाही समिधा कुठलि उरली
कारण कुठले निमित्त कुथले
शोध शोधता मुळी न गवसली
रात्रीच्या या पहिल्या प्रहरी
सरून गेली निमीत्त सारी
जगण्याच्या या श्वासामधली
उरली केवळ सुस्त सावली