जर पंतप्रधानानी स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी

खरेतर आपला देश जरी महासत्ता होण्याची वल्गना करू लागला आहे का? आपण
सध्या दोन वर्ष तरी दुष्काळसदृश्य स्थितीमधून गेलो आहोत व यंदाही अद्याप
पुरेसा पाऊस पडला नाही. तेव्हा आता लवकरात लवकर प्रगती साधण्यासाठी
आपण प्रथम काटकसरीचे धोरण अवलंबणे जरूर आहे म्हणून प्रथम मी माझा पगार या
आधीच्या वेतन आयोगा प्रमाणे घेईन.

आपण सर्व खासदारांनी सुद्धा असेच
करावे व मग  आपण प्रथम सर्व कर्मचाऱ्याचे पगार या आधीच्या वेतन
आयोगाप्रमाणे करूया.  सध्या बऱ्याचदा वेळेत काम न झाल्याची ओरड फार वेळा
ऐकू येते, मला वाटते आपण उष्ण कटिबंधात राहत असल्यामुळे कर्मचारी एका
दिवशी जास्त काम करू शकत नाहीत म्हणून असावे म्हणून आता आपण आठवडा सुद्धा
७. ५*६ असा करू. जर तरीही अशाच तक्रारी येत असतील तर आठवडा ६. ५*७(६. ५
तास*७ दिवस) असा करूया.

दुसरे असे की सध्या सुट्याची सध्या पण वाढली
आहे. यातील बहुतेक सर्व सुट्या या सणाच्याच आहेत आपल्या देशात बरेच धर्म
आहेत. जेव्हा एका धर्माचा सण असतो तेव्हा दुसऱ्याला सुटीची गरज नसते.
तेव्हा एकूण सुट्याच्या संख्येच्या निम्म्याने एवढ्या पगारी रजा वाढवून
देऊन ज्याचे सण साजरे करायचे असतील त्यांना त्या दिवशी सुट्टी घेता येईल व
सर्व कामे पण वेळेत व्हायला मदत होईल.