आजकाल कुनीबी गांधी टोपी घालत्यात
आन मोठ्याने हजारे हजारे बोलत्यात
थोडसं सरकत्यात थोडं वरडत्यात
दमल्यावर मंग एसी कारने चालत्यात
आजकाल कुनीबी गांधी टोपी घालत्यात
आन मोठ्याने हजारे हजारे बोलत्यात
यांचा मोर्चा लई दांडगा
सगळ्या डाळींचा सरमिसळ सांडगा
ऊस डोंगा परी रस नोहे डंगा
तरी बी वरल्या रंगाला भुलत्यात
आजकाल कुनीबी गांधी टोपी घालत्यात
आन मोठ्याने हजारे हजारे बोलत्यात
मोर्च्यामंदी झाली जिवाची काहिली
गुपचुप बिसलेरी तोंडाला लावली
गरिब लोकांला उन्हाचे चटके बसत्यात
आजकाल कुनीबी गांधी टोपी घालत्यात
आन मोठ्याने हजारे हजारे बोलत्यात
कमळावर चिखल दाटलेला
घड्याळात टाइम गोठलेला
हातावर भ्रष्टाचार गोठलेला
आता हत्ती पण सायकली चालवत्यात
आजकाल कुनीबी गांधी टोपी घालत्यात
आन मोठ्याने हजारे हजारे बोलत्यात
पैसा जनतेचा पन बँक मातुर स्विस
कुनाला निवडावं राह्यला न्हाइ चॉइस
सरकारी तिजोरीवर नाग फणा डोलत्यात
आजकाल कुनीबी गांधी टोपी घालत्यात
आन मोठ्याने हजारे हजारे बोलत्यात