...तळाला

ढोंग माझे आता कळाले जगाला
चिकटली  नाणी  मापट्यांच्या तळाला
चोरटी आशा भोगण्याची सुखाला
लागलो मीही भामट्यांच्या गळाला
मी म्हणे आहे चांगला वागण्याला
स्पर्श देवाचा सोंगट्यांच्या पटाला
हालचाली ताब्यात ना आज माझ्या
ना बळी गेलो त्या नट्यांच्या कटाला