वीणा

वीणा

इंग्रजीत म्हणती व्ही-ई-ई-एन-ए
व्ही हे बावीसावे अक्षर अल्फाबेटसमधले २+२=४
ई हे पाचवे अक्षर(दोन वेळा) =५+५
एन हे चौदावे अक्षर=१+४=५
ए हे प्रथम अक्षर=१ 
४+५+५+५+१=२०=२+०=२
दोन आकडा दर्शवितो बुद्धीमत्ता आणि गुणविशेष
मातृ-पितृ ऋण, आणि दुसऱ्यासाठी समर्पण
दुसऱ्याला सतत साथ, अनुभवाचे दान
दान हा स्वभाव सरस्वतीचा 
सतत विद्येचे दान
म्हणुनच वीणेला सरस्वतीजवळी स्थान
हीब्रू भाषेत अल्फ-बेट असे म्हणती
बेट हे दोन आकडयासारखे
म्हणून बेट वरून शब्दोत्पत्ती  "बोथ"
तोराह आणि बेरेशिट ग्रंथात प्रथम अक्षर 'दोन'
बेट म्हणजे मानवी जीवनप्रवास आरंभ
डावीकडे व ऊजवीकडे , काही शुभ, काही खडतर
दोनाला मान प्रथम कारण दोन हा दर्शक वृद्धीचा
तसेच निदर्शक अनेक अवयव हे दोन असल्याचा
असा हा दोन आणि अशी ही वीणा
वारकरी पुकारी आणि नाद घाले साद रामकृष्णा
वीणेचेही बहुविध प्रकार 
सरस्वती (किंवा रघुनाथवीणा), 
चित्र आणि विचित्रवीणा, रुद्रवीणा
सरस्वती व चित्र आणि साऱ्याच ह्या संगीतवीणा
प्रत्यकीचा स्वतःचा विशेष बाणा
वीणाधारी वारकरी 
जीवापाड सांभाळ वीणेचा करी
मृदू बोल वीणेचे सदैव उच्चारी
रामकृष्ण हरि,
जय जय रामकृष्ण हरी ॥