मूर्ती

हिंदू धर्मात मुर्तीपुजनास महत्त्व अनन्य

चराचरात देव, अणुरेणूत देव हे सर्वमान्य
मातीत देव, पाषाणात देव, फुलात देव,
प्राण्यात देव, ज्याला जे भावेल तेथे देव
दिव धातुपासून बनला देव, दिव्य आहे तो देव
दिवा पाहतो सर्वत्र, तसा सर्व जगास पाहतो देव 
जसे दुधात तुप, तसा सर्व काळात-वस्तुत देव
जरी सर्वत्र देव, तरी भावातच खरा देव
मूर्तीपुजा मानणे न मानणे हे वैयक्तिक
न मानणे हा ठाम भाव त्या भावातच देव
पाषाण, काष्ठ, धातू, मृत्तिका, चित्रमय
आणि वाळु, मनोमयी, मणिमय (आठ मूर्तीचे प्रकार)
जन्म होताच माणुस बदलतो
मी कुठे म्हणालो, मला संकटातून सोडव म्हणतो
अहंने भरला मानव, देव तेंव्हाच हसतो
दीनदशा भक्तांची, देव तेंव्हाच रडतो
मूर्ती माध्यम देवाशी संवाद साधण्याचे
देव प्रत्येक शरीरात, मूर्ती निमित्त त्यासव बोलण्याचे
अडचणींवर सखोल चिंतन, हेच ऊद्देश मूर्तीपुजनाचे
देव सर्वांना सर्व देतो, देह, ईंद्रिय, व वरदान प्रेम, शक्तीचे
भाव म्हणजे चित्ताची एकाग्रता
शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव, वात्सल्यभाव, माधुर्यभाव
रामाचा स्वभाव, कृष्णाचा प्रभाव, शिवाचा समभाव
उद्देशः कामनांचा अभाव व्हावा, नामावर असो दृढभाव
वेदमूर्ती, श्रीमूर्ती, पूण्यमूर्ती, ब्रह्ममूर्ती, 
भाग्यमूर्ती, पापमूर्ती, वाग्डमयमूर्ती, ज्ञानमूर्ती व कैवल्यमूर्ती
असेही प्रकार वाग्डमयात सापडती
केलेले, मानलेले, झालेले व स्वयंभू हेही प्रकार जगी असती
भावोत्कटतेचा ऊच्चतम अवतार मूर्ती
ईच्छा-आकांक्षाचा अविष्कार मूर्ती
पावित्र्याचे पूर्ण स्वरुप ही मूर्ती
हिंदू धर्माची ही महती, ना बंधन कोणास
ज्याचा जसा भाव तसे त्याने पुजावे देवास