अर्थतज्ज्ञांचे अस्तित्व

अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचे नाव प्रकाशात आले. सुरेश तेंडुलकर (विजय तेंडुलकरांचे बंधू) यांचे नाव त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे कळले. 
अर्थतज्ज्ञांबाबत काही घडले (पुरस्कार, निधन किंवा इतर काहीतरी) घडले की त्यांच्याबद्दल बातमी येते, ते प्रकाशात येतात व प्रत्येक बातमीत संबंधित तज्ज्ञाने 'अर्थशास्त्रातील मूलभूत लेखन' केल्याचे लिहिलेले असते. बातमी येण्यापूर्वी  ते केवळ त्यांच्या वर्तुळात माहीत असतात.

भारतात इतके lमुबलक अर्थतज्ज्ञ असतील तर आतापर्यंत  भारतातील विविध प्रश्न सोडविण्यात त्यांचा कोणता वाटा राहिलेला आहे?
की केवळ त्यांच्या सगळ्या थिअरीज कागदावरच योग्य असतात ?
सरकार त्यांच्यापर्यंत पोचण्यात कमी पडले की ते सरकारपर्यंत पोचण्यात कमी पडले ?
त्यांचे नक्की अस्तित्व काय ?