रामायण ...प्रतिकात्मक

भाऊ, मना आता यायला लगला कंटाला

त्याच त्याच कथा रामाच्या, जरा आता पजे कईतरी येगला
अरे बाला, कथा ठेव बर जरा बाजुला
कई अर्थ लागतो का लाग बघायला
त्यान क हाये दादुस 
रामाने त्राटीका मरली,
लक्ष्मणाने शुर्पनखा मरली
आन भरतान कैकयी नाकारली
आता मना सांग, सारी गोष्ट मीनी किती येला ऐकली
बाला, जरा येगल्या नजरेने बघ
राम म्हंजे मूर्तिमंत ज्ञान
लक्ष्मण म्हंजे मूर्तिमंत वैराग्य
आनी भरत म्हंजे मूर्तिमंत भक्ती
त्राटीका म्हंजे क्रोध, तीला रामाने मरली
म्हंजे रामाने (ज्ञानाने)क्रोधाला मरले
शुर्पनखा म्हंजे काम
म्हंजे लक्ष्मणाने (वैराग्याने) कामाला मरले
कैकयी म्हंजे लोभ
म्हंजे भरताने (भक्तिने) लोभाला मरले
अशी ही प्रतिकात्मक ज्ञान, वैराग्य, भक्तीची रुपे
.....
मस्तच संगला तुनी दादुस
पन मंग रावन, कुंभकर्न, बिभीषनाचे कं?
तीथे बाला आसा ह का, रावन म्हंजे राजस
बिभिषन म्हंजे सात्त्विक, कुंभकर्न म्हंजे तामस
जोपर्यंत सात्त्विक राजा होत न्हाई 
तोपर्यंत रामराज्य कई येत न्हाई
... दादुस ह्यो पन पटला
मना आता प्रशन परला हाये ,
आवरे पॉवरफुल देव ह्यांनापन कसे पलवले
आहिरावन आनी महीरावनाने
सोप्पा हाये बाला,
राम म्हंजे ज्ञान, 
ज्ञानाला(अहि-रावन) अहं पलवतो
आन लक्ष्मण म्हंजे वैराग्य, 
वैराग्याला (महि-रावन )ममता पलवते
दोघांनी ह्यांच्यापासून सावध राहावा ह्योच अर्थ असतो
हनुमान ऱ्हयला ना रे दादुस 
हनुमान म्हंजे भक्ती
ज्ञान, वैराग्य, भक्ती एकत्र आले आनी
त्यांनी अहि-मही संपवले
आरं येऱ्या
भक्ती ही माता सर्वांची
ज्ञान आन वैराग्य तिच्या मागून येतात
आन बाला
तुला, मला --ह्या जिवनाचा अर्थ संगतात.
लय भारी रे दादुस
फुका नावा ठेवित व्हतो मी रामायनाला
तु बोतला, आन डोले लगले बघ उघरायला
....
दादुस राम राम जपाने वाल्या सुधारला
आसा ह्यो चमत्कार कसा होला त्ये सांग मला
बाला ह्यो एक प्रानायामच ह
"रा" बोल बघू तू.. बोतला बघ श्वास बाहेर गेला
म्हनजे शरीरातल्या समद्या दुर्गुनांना तुनि भायेर फेकला
आता "म " बोल बघू .. बघ तोंड बंद झाला
म्हंजे ह्या दुर्गुनांचा प्रवेश बंद झाला, आत सत्याला कोंडला
आसा जर तुनी सारखा केला
मना सांग किती येल लागेल वाल्याच वाल्मिकी व्हायला ॥॥
....