साडेतीन

साडेतीन
साडेतीन चरणात ओव्या लिहिती माऊली
साडेतीन आकडा आढळतो पावलोपावली
'औट' म्हणजे साडेतीन बोलते भाषा बोली

साडेतीन हाताचा हा देह

पण जग जिंकायाचा मोह
जीव आहे म्हणून कौतुक देहाचे 
नाहीतरा खणावे खड्डे साडेतीन हाताचे
चौदा रत्नांपैकी अमृत हे एक
साडेतीन ठिकाणी सांडले थेंब
प्रयाग, उज्जयनी, त्रंबकेश्वर आणि अर्था हरिद्वार
कुंभमेळा म्हणजेच देव स्विकारिती मानवाचा सत्कार
ओम हेही एकाक्षरी ब्रह्म 
साडेतीन ह्याच्या मात्रा
माऊली म्हणतात, 
साडेतीन वेढ्यामध्ये कुंडलिनी
निजली जैशी अधोमुख सर्पिणी
महाराष्ट्र देशी साडेतीन शक्तीपीठांची महती
कोल्हापूर, तुळजापूर, गड तो माहूर
आणि वणीची जगदंबा अर्धे पीठ असे बोलती
साडेतीन शहाणेही
पेशवे दरबातले जाणते मुत्सद्दी
संपूर्ण माहिती :(पारमार्थिक शत-कोटीः यशवंत पाटील महराज)