मोहोळ रोमांचाचे

चित्कार मादक रोमांच्यांच्या मोहोळाचे

शिंतोड्यांचा मोहोर ल्यायल्या सर्वांगाचे
हुरहुर काहुर डोंब धुसमुसळ्या भावनांचे
शिरशिर सर्पिणी पन्हाळीत पाठीच्या नाचे
सुरांचे लोळ उफाळती विळखे आतड्यांचे
कवेत घुमावेत धुमारे श्वास-महोत्सवाचे
आवरण भावनेला आलिंगनाच्या झालरीचे
श्वासांच्या तुतारीत गीत उत्कट सुवासाचे
रुप ओलेत्या पर्जन्याच्या नवलाईचे
वादळी आवेशात आदळुन वीज फुटण्याचे