मना मनात श्रावण...

थेंब धरेवरी येता
झाले हिरवे पिकून
पाना फुलात ओलावा
येई पुन्हा उमाळून

थेंब जरतारी साज
रंगारंगात न्हाऊन
पाचूवाणी झालं रान
दिठी गेली खुळावून

थेंब अलगद पाती
खुणावती कोणा कोण
असा लाजरा साजरा
मना मनात श्रावण...