गरज

नवऱ्याला सध्या काम भेटत न्हाई
साधा हाये बो बिचारा
आत्त सांभालला न्हाई तर
व्यसनी व्हईल कदांचित
गरोदर होती ती
पण काम मागत होती
विश्रांती घे सांगून 
मी तीला टाळत होतो
ती जात नव्हती
खरेच गरजेला जात कोणती?
डोळ्यातील खळबळ
विनंती ओरडून सांगत होती
भीक मागत नव्हती ती
मग मी का आखडतो आहे एव्हढा
माझेच भागत नाही म्हणतोस
अरे, मग अजून थोडे सोस
चल चालू कर काम, पाहिजे ते
देईन तुला मी मला झेपेल ते
डोळ्यात तीच्या बाळ पोटातील हासले
वाटले जग काय म्हणेल, झक मारले