पाउस गाणी

पावसात ढग गाणे म्हणुनी आले आले आले
गाणे म्हणुनी तेही रिकामे झाले झाले झाले
क्षितिजात रंग आहे कोणते , वाऱ्याबरोबर कोण हे डोलते
आहे ही किमया कोणाची  ,कोणी सांगा मला या मनाची   
मी समजूत घालू कशी ?
पावसात ढग गाणे म्हणुनी आले आले आले

गाणे
म्हणुनी तेही रिकामे झाले झाले झाले
वाहुनी गेलो सोनेरी किरणात , भटकुनी आलो हिरव्या कुरणात
जादूच जादू भावली मला , वनदेवी आज पावली मला
उडतो आज मी वाऱ्याबरोबर , भास नाही हा आहे खरोखर
झाली गड्या आज गोची , कोणी सांगा मला या मनाची   
मी समजूत घालू कशी ?
पावसात ढग गाणे म्हणुनी आले आले आले

गाणे
म्हणुनी तेही रिकामे झाले झाले झाले
झाडाझुडपात पावसाचे कोमल सुर , गेला वारा कुठे गाणे म्हणत दूर
मीही म्हणतो पावसाची गाणी , हिरव्या ओल्या दिवसाची गाणी
गाते सावली गाते हे ऊन , सर्वांच्या ओठी पावसाची  धून
भाषा ही समर्पणाची , कोणी सांगा मला या मनाची   

मी
समजूत घालू कशी ?
पावसात ढग गाणे म्हणुनी आले आले आले

गाणे
म्हणुनी तेही रिकामे झाले झाले झाले