समाजसेवेतून नेते की सत्तेसठी बनलेले नेते

खरे तर आपण लोकशाही निवडली तेव्हा आपल्या डोळ्यासमोर होते ते समाजसेवेतून नेते बनलेले नेते . पण आज लोकशाही आहे खूप जुनी झालेली पण आहे पण अजून रामराज्य (चांगले राज्यकारभार असणारे राज्य )आले नाही तेव्हा विचार करताना लक्षात येते ते आज जे नेते आहेत त्यातील किती समाजसेवेतून बनलेले आहेत? मला वाटते बहुसंख्य नेते हे सत्तेसाठी (खुर्चीसाठी )समाजसेवक स्वतःला म्हणवणारे नेते आहेत तेव्हा जर आपल्याला लोकशाही टिकवायचीच असेल तर हे चित्र बदलायला हवे त्या साठी समाजसेवेतून बनलेले नेते हवेत व ते जर मिळवायला हवेत तर आजची निवडणूक पद्धती आमूलाग्र बदलायला हवी म्हणजे एक तर उमेदवाराला निवडणुकीला उभे राहिल्यानंतर संधाकाळी त्याचा अर्ज छाननी करून कळायला हवे व दुसऱ्या दिवशी निवडणूक होऊन तिसऱ्या दिवशी निकाल समजायला हवा किंवा ही गुप्तमतदान पद्धती रद्द करून प्रत्येक पंचायतीची निवडणूक हात वर करून घ्यावी त्यातील निवडलेले सभासदांनी आमदार असाच निवडावा व खासदार पण त्यांनी असाच निवडवावा पण यात काही प्रश्न उद्भवू नये म्हणून त्याची मुदत कमी ठेवावी लागेल. 

असे झालेतर मला वाटते खरे समाजसेवे तून बनलेले नेते वर येऊ शकतील.