पनवतीच जनू

भाषाः आगरी...मराठी

अवरी संकटा, लगली पनवतीच जनू

समदी चोरटी, सुखबी पलवतीच जनू
क करू बोल मी, सगली बेइमान म्हनू
न खरा जापती, समदा लपवतीच जनू
विषयाला बगल, जर मीच जवल असन उभा
पटकिनी मना, तिथशा कटवतीच जनू
मग तो भेटलो, तिजला मुरख मी मजनू
लुटला जा मना, सगला पचवतीच जनू
मन माझा तुटे, इसवास नवताच जनू
मरले कालजा, जखम भलभलतीच जनू