सखी तुझी आठवण येते...
दूरदेशी येथे नाही कोणी जीवाभावाचे
नाही कोठे येथे जीवलग नाते मधाचे
मनातल्या गोष्टी राहिल्या मनात
हितगुज माझे सांगू कुणाच्या कानांत...
दरवळतो आसमंतांत...
तुझ्या माझ्या वेणीतला मोगरा
आणि... आठवते का तुला...
आवळे-चिंचा खाऊन कसा
आवाज झाला होता घोगरा...
सखी तुझी आठवण येते...
अवतीभवती जेव्हा कधी बघते
चिमण्या अश्या कुजबुजताना...
आठवणीने तुझ्या...
लवतात पापण्या भिजताना
कशी आहेस?... कुठे आहेस?...
हुरहुर लागली माझ्या मना...
असशील तेथे सुखी राहा
हीच मनी कामना....