अताशा ऐकायलाच जरा कमी येते
त्यात हे अश्रू फारच हळू बोलतात
जगापासून लांब कोणाच्या डोळ्यात राहीन म्हणतो
योग्यवेळी अश्रुंबरोबर बाहेर पडेन म्हणतो
अश्रू का कधी भेदभाव करतात
दुःखात आणि आनंदात सारखेच वाहतात
डोळे कोरडे निस्तेज जरी वाटले
मला जाणीव आहे काही अश्रू हरवले आहेत
हृदयाला म्हणे भोक पडले आहे, पडणारच
तीच्या अश्रूंची संततधार ते झेलत आहे
मिटतोच मी डोळे आता प्रयत्नपुर्वक
गोंगाट अश्रुंचा आता सहन होत नाही