कावला

श्राद्धाच्या टायमाला मिनी इच्यारला 

माझी ब तर शाकाहारी व्हती मंग
तीला ह्यो मांसाहारी कावला कसा शिवतो?
मना काई गरज व्हती न्हाई ते ईचारायची
साऱ्याची बोलती बंद
अता उत्तर शोधने माझे मलाच कराया पजे
१) वायस पिंड (कावल्याचा आन्न)
  शास्त्रान असा लिवल्याला हाय का
  सात पर्कारची मान्से समाधान पावतात श्राद्धामुले
अ)अग्नीहोमामुले देव ब)ब्राह्मन भोजनाने स्वर्गातले पितर
क)पिंडदानाने पितृलोकातले पितर ड)अन्नदानाने मानसे
ई)उच्छिष्टाने पिशाचे फ)विकीरा अन्नाने नरकातले 
ग)अज्ञात नातेवाईक वायस पिंडाने
२) ब्रह्माचा मुलगा मारिची आन त्याचा काश्यप
    काश्यपाला सात बायका 
    त्यातल्या एकीचा नाव काकी 
  तीची पोरा ती काक म्हंजे कावले
  (अग्नी पुराणः१९)
३)कावला ही पापाची निशानी असा पन बोलतान
  कलावती कासीच्या राजाची कन्या
  मथुरेचा पापी राजा दसर्हाशी लगीन झाला
  गर्ग ऋषीने मंत्राने राजाला शुद्ध केला
  पान्यामंदी राजाला ऊभा केला
  सम्दी पापे शरीर सोरून पलाया लगली
  भायेर येताच त्यांनी कावल्याचा आकार झेतला
  काही उरून गेली काही तेथेच जलाली
  (शिवपुराण)
४) कावला आनी चावलाचे (तांदलाचे) दान
  एकदा मरुत्ता राजाने महेश्वर सत्र केला
  ईंद्र आनी सारे देव आले सत्राला
  रावन आरवा आला देवांना
  देव घाबरले, पक्षांचे आकार घेतले
  ईंद्राने मोराचा तर यमाने कावल्याचा आकार केला
  कुबेराने सरढोकाचा तर पावसाने राजहंसाचा
  तवापासून यमाला कावले आवरू लागले
  आनी नात्यातल्या साऱ्या पितरांसाठी
  कावल्याला भाताचा पिंड देवू लागले
  ह्यो मान कावल्याला यमाने दिला
(वाल्मिकी रामायन, बुक ७, चॅप्टर १८, श्लोक ५)
५) दशरथाच्या श्राद्धाला पितरांना यायाला येल लागला
    रामाच्या तोंडून शब्द निघाले 
    इथून पुरे कोनाच्याच पितरांना श्राद्धाला पितरानि यायाचे नाय
    आता बोतला त खरा पन शब्द मागे घेता येईनात
    यमाला ऊपाय ईचारला 
    यमाने मंग आपले वाहन कावल्याला संगला
    ईथून पुरे तु हजर ऱ्हायाचे श्राद्धाला
६) पक्षांमध्ये कावला लई हुशार आसतो
    तो समद्यांना बोलावून मंगच खातो
७)आसा बोलतांन एखाद कावला मेला त 
    सम्दे कावले जमतात आन नंतर मंग
    पान्यान आंग ओली करतान
देवाने मानुस जल्माला घातला
त्याला ना जात दिली 
ना कई खान्याचा बंधन घातला
प्रत्येकाचा पुर्वज ह्यो शिकारीच व्हता
नंतर मानसाने भेदभाव चालू केले
जसा पटला तसा खाना केला
आन त्या त्या येलेपरमाने दर्जा दिला
*डोंबिवलीजवळचे ऊंबार्ली गाव हे कावळ्यासाठी प्रसिद्ध आहे
  तसेच ह्या गावातील घरगुती गणपती हे अप्रतिम कला व 
  सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत.
*मला माहित आहे काही मुद्दे न पटणारे व बालिश असू शकतात
  पण माझा प्रयत्न हा माहिती संकलनाचा आहे. त्यामुळे हे बरोबर 
  की चूक, किंवा माझे बुद्धीमत्ता प्रदर्शन असे नाही. विद्वानांनी 
  आपले मत पौराणिक माहितीत भर व प्रकाश टाकणारे द्यावे.
  वैयक्तिक नसावे.