रोमांचांची शरीरभर गोंडस वणवण
सुगंधीआचारांचा मुक्त संचार
चेहऱ्यावर फुलपाखरी उत्सुकता
सरसरून झोंबणारे पारदर्शक विचार
स्पर्शाची अनाकलनीय तळमळ
बोटात झळाळती वीज
तार जीवनाची सुळावर
तुटावे की नवजीवनास आळवावे
तांबारलेल्या प्रकाशात प्रेम
जगाला जंगलात सोडून
उद्देष्टांच्या पायवाटेला
ना माहिती कोण चालेल ऊरावरुन