नको नको गं बाय मला अशी तू छळू
काय सांगू तुला तू माझ्या गळ्यातली माळू
तुज भासत असलं हा वात्रटच मेला
मज खास तो तुझ्या बाहुचाच शेला
कोण तू आन मी गेलो दोघं विसरून
तू दिल्या शबुदाला मी आहे जागून
तुझे नि माझे होते अंतरीचे नाते
तुझ्या संगे गायिली मी मनातली गीते
लोक लाज संगे तू मज सांभाळिले
तुझ्या विन मज कोणी न ओळखिले
तुवा समीप मी आलो ओढिच्याच ताना
नको सारू दूर मला तू मीरा मी कान्हा