वाट पाहत आहे ...

माझ्या हृदयाला का तूच खास आहेस,
तुला भेटण्याची ही कुठली आस आहे,
मी त्या भेटीची वाट पाहत आहे... (१)
तुझ्या समोर येऊन काहीतरी सांगायचं आहे,
ते ऐकून तू गालातल्या गालात हसशील,
मी त्या हस्त क्षणाची वाट पाहत आहे... (२)
तुझ्या डोळ्यांचे भाव मला कळत आहेत,
पण तुझ्या मनातलं ऐकायचं आहे,
मी त्या अनमोल शब्दांची वाट पाहत आहे... (३)
तुझ्या केसांशी खेळायचं आहे,
मग हळूच बोटाने बट कानावर फिरवशील,
त्या लाजऱ्या चेहऱ्याची वाट पाहत आहे... (४)
तू रुसल्यावर समजावायचं आहे,
तुला मिठीत घेऊन सगळं विसर पाडायचं आहे,
घट्ट धरशील अशा मिठीची वाट पाहत आहे... (५)
समुद्राच्या पाण्यावर हे मन तरंगत आहे,
किनाऱ्याला लागून तुला स्पर्श करायचं आहे,
अशी एक लाट बनायची वाट पाहत आहे... (६)
हे स्वप्न आता साकारायचं आहे,
तुझ्या हातात आपली रेशीम गाठ आहे,
कधी बांधशील दोन मनांना ह्याची वाट पाहत आहे... (७)
                                        - यशपाल पाटील (९९७००११८३९)