...................................................
मरणानंतर...

मरणानंतर सर्व थांबते... वेद-वेदना
मरणानंतर सर्व थांबते... भाव-भावना
मरणानंतर सर्व थांबते... दुःख-वंचना
मरणानंतर सर्व थांबते... आस-कामना
मरणानंतर सर्व थांबते... भास-कल्पना
मरणानंतर सर्व थांबते... भीक - याचना
मरणानंतर सर्व थांबते... पण खरेच का?
मरणानंतर पुन्हा नव्याने जन्मयातना!
पुन्हा नव्याने तेच विषय अन् त्याच वासना...!!
मरणानंतर...
...................................................
- प्रदीप कुलकर्णी
...................................................
रचनाकाल ः 26 ऑक्टोबर 2012