आनंदाच्या क्षणाना
घेऊन आली दिवाळी
आसमंती प्रकाशाची
रंगबिरंगी रांगोळी !
पणत्यांच्या रांगा
रांगोळ्यांची कला
सुगंधाची बरसात
लाडू चिवड्याचा घमघमाट
लक्ष्मीचे पूजन
फटाक्यांचे गुंजन
भावा बहिणीच्या नात्यात
खुलते प्रेमाचे बीज
सुहृदांची साथ मिळते
सर्व येती समी प !
प्रत्येक घर गाइ
दिपोस्तवाचे गी त
मनामनात असा उजळे
प्राज्ञानाचा आकाशदीप !!!
~~ मनिष
!!! सर्व मनोगत वाचकाना आणी त्यांच्या सर्व मनोगताना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!