जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर
म्हणून तर स्वप्न बघतो तुझ्यावर..
जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर
म्हणूनच तर वेड्यासारखा आकाशातले तारे मोजतो दिवसावर...
काटे असतात सुंदर गुलाबावर
म्हणूनच प्रेम करतो त्या काट्यांवर...
जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर
म्हणूनच तर अश्रू येतात माझ्या डोळ्यावर...
माझ्या रागातही किती भर देतेस हसण्यावर
म्हणूनच तर फिदा आहे तुझ्या नाजुकश्या खळीवर...
मला साथ देशील आयुष्यभर हेच कोरलंय तुझ्या नावावर
म्हणूनच जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर..
हे रेशमी नात्यांचे बंधन कधी जुळतील
हेच सात फेऱ्यांचे भविष्य बघतोय तलहातावर...
हे २०१२ वर्षही संपून गेले काही क्षणांवर
पण सुखद आठवणी जाग्या राहतील ह्या हृद्यावर..
जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर
यशाची लहर येऊ दे २०१३ ह्या नूतन वर्षावर...
खरंच जिवापाड प्रेम करतो तुझ्यावर
आणि करतच राहणार तुझ्या हृद्यावर अन फक्त तुझ्यावर... फक्त तुझ्यावर ...
---विरेंद्र भगत (विरु)