मराठी मंडळ कोरिया दिवाळी अंक २०१२ (पूर्वगंध विशेषांक)

मराठी माणूस म्हटलं, की दिवाळी अंक हे समीकरण ठरलंय. म्हणजे मराठी म्हणजे गणेशभक्त असणारच जसं गृहीत धरल्या जातं, तसंच काहीसं दिवाळी अंकाशिवाय मराठी माणसाची दिवाळी होत नाही.

आजच्या घडीला सुमारे ३५० मराठी माणसांचं ’मराठी मंडळ कोरिया’ वर्षभरात विविध कार्यक्रम राबवते, त्यातलाच एक म्हणजे ’साहित्य-शोभा’ दिवाळी अंक. यावर्षीचे दिवाळी अंकाचे २रे वर्ष.

हा अंक ऑनलाईन वाचता येईल किंवा पीडीएफमध्ये उतरवून घेता येईल. अंक वाचण्याकरिता दुवा क्र. १ इथे भेट द्या.

आपल्या सूचना व प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,
विजय देशमुख