हवी मला थोडी जागा, उणे माझे जपण्यासाठी
आपुल्यांमध्ये वाटण्याकरता, दुणे माझे जपण्यासाठी
हवी मला थोडी जागा, दु:ख माझे जपण्यासाठी
नि फुलांसासाखे वेचलेले, सुख माझे जपण्यासाठी
हवी मला थोडी जागा, वेडे भय जपण्यासाठी
अन वेड्या आठवणींची, वेडी लय जपण्यासाठी
हवी मला थोडी जागा, काही नाती जपण्यासाठी
मनातल्या वादळापासून, जळत्या वाती जपण्यासाठी
हवी मला थोडी जागा, तुझी जागा जपण्यासाठी ......