या तरुंची आर्त पाने सांगती काही मनीचे
ऐक तू संवेदनेने गूज त्यांच्या अंतरीचे
पालख्या रात्री निघाल्या सृजन काळाच्या मुहुर्ती
निखंळणाऱ्या चांदण्यांची करत भावे मंगलार्ती
पाकळ्यांच्या होत दासी विमल गंधाच्या महाली
वंश वेळू बासरीचा सूर सांगे मज खुशाली
जन्मल्याची फिरत द्वाही पोचते जेंव्हा नभाला
सूर्य ही वंदील आता स्फूर्तिच्या या काजव्याला