वाटचाल

तुला पाहताना,  क्षुधा शांत झाली

तुझ्या भावनांनी, मला साथ केली ॥ १ ॥

तुझी वाट माझ्या, मनी चालली

तुझी स्वप्न माझ्या, नयनी उमटली ॥ २ ॥

तुझ्या जवळ येता, प्रीत भावुक झाली

तुझ्या संगतीने, सात जन्मात न्हाली ॥ ३ ॥  

माझ्यातर्फे चार ओळी. आताचं सुचल्या