स्वप्नांच्या गावी..

स्वप्नांच्या त्या गावी जावे..

सहज सख्याला भेटावे,
अन प्रेमच्या हिंदोळ्यावर
दोघे मिळुनी झोके घ्यावे..
तू माझ्यात अन मी तुझ्यात..
हरवून जावे कायमचे..
क्षणी अशा या शान्त निवांत
मीलन व्हावे दोघांचे
नयनी तुझ्या फक्त मी
आणि तूही माझिया..
पण बावरले अन मिटले डोळे..
वाहिले मी मलाच तुला..