लाल भोपळ्याची भाजी

  • लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी ३ ते ४ वाट्या (पाण्याने धुवून निथळून घ्या)
  • दाण्याचे कूट २ मूठी
  • खवलेला ओला नारळ १ मूठ
  • चिरलेली कोथिंबीर २ ते ३ चमचे
  • लाल तिखट १ चमचा, मेथी दाणे पाव चमचा
  • गूळ ३ ते ४ चमचे चिरलेला, मीठ
  • मोहरी, जिरे, हिंग, हळद
५ मिनिटे
२ जण

मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते तापले की त्यात तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग, जिरे, मेथीचे दाणे, व हळद घालून फोडणी करा. फोडणीत अर्धा चमचा तिखट घाला. नंतर त्यात भोपळ्याच्या फोडी घालून डावेने ढवळून घ्या. नंतर अगदी थोडे पाणी घाला व एक वाफ द्या. नंतर त्यात अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, गूळ घाला व परत एकदा भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात पाणी घालून वाफेवर शिजवा. नंतर त्यात दाण्याचे कूट, खवलेला ओला नारळ, गूळ व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हवे असल्यास अजून थोडे पाणी घालून  भाजी नीट ढवळा.  गॅस बंद करा.  ही भाजी पटकन शिजते. फोडी लगदा होईपर्यंत शिजवू नका. फोडी पूर्ण राहिल्या पाहिजेत. रस अजून हवा असल्यास अजून थोडे पाणी घाला.

लाल तिखट, मेथीचे दाणे व पुरेसा गूळ या मिश्रणाने ही भाजी चविष्ट लागते.

टीपा नाहीत.

सौ आई