जन्मशताब्दि वर्ष

आज २३ जुलै, हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांची ९९ वी जयंती, म्हणजेच हे त्यांचे जन्मशताब्दि वर्ष. भारतिय क्रांतिपर्वातला आजाद हा महान योद्धा. यांच्या विषयी लिहावे तितके थोडेच आहे.


या जन्मशताब्दि वर्षानिमित्त त्यांच्या विषयी अधिक माहिती मिळाली तर उत्तमच, पण किमान चुकिची माहिती प्रसृत होउ नये ही मनोमन इच्छा आहे. आंतरजालावर विहार करताना एका संकेतस्थळी आजादांविषयी जे काही वाचले ते सांगीतले तर विश्वास बसणार नाही. नेताजी सुभाष यांनी चंद्रशेखर आजाद यांच्या मदतिने आझाद हिंद सेनेची स्थपना केली असे म्हंटले आहे.पहा