टोमॅटो मध्यम आकारात चिरून घ्या. मध्यम आचेवर पातेले ठेवा. ते तापले की
त्यात तेल घाला. तेल पुरेसे तापले की त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून
फोडणी करा. आता या फोडणीत चिरलेले टोमॅटो घाला व परतून घ्या. थोडे पाणी
घालून झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा. आता यामध्ये लाल तिखट, धनेजिरे
पूड, साखर, मीठ घाला व परत एकदा ढवळून त्यात थोडे पाणी घाला व परत झाकण
ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व त्यात दाण्याचे कूट, ओला नारळ, कोथिंबीर
घालून रस्सा पातळ होण्यासाठी १ ते २ वाट्या पाणी घाला. एक उकळी आली की गॅस बंद
करा. रस्सा तयार झाला आहे. गरम गरम भाताबरोबर हा रस्सा छान लागतो. टोमॅटो
शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे हा रस्सा झटपट होतो.
टीपा नाहीत.
सौ आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.