श्रावणातले प्रेम

नको सोडऊ श्वाश, श्वासात गुंतलेले
राहू देत हातही, अशे हातात गुंतलेले

किती आनंद देती,  ह्या श्रावणातल्या गार धारा
पाणी अंगावर, सोबत तू, अन आभाळ ओढलेले

का शांत, बोल ना,  सोड अबोला असा हा
दोघेही एकच, भिजलो प्रेमाने, दिसतो पांगलेल

सुकून गेलेत कपडे, अंगावरीच, थरथरतेय अंग माझे
निघेनात पाय,  अंधार साचलेला, जरी शब्दही संपलेल

किती अंधारुनी आले, कोसळतील पुन्हा श्रावणधारा
चल रंगवूया उद्या पुन्हा, स्वप्न अर्ध्यात थांबलेले.

रुपेश बक्षी
84463 77185