रामाच्या गावाला जावुया

झुक झुक जीवन गाडी , कर्मांच्या रेषा दुनियेत झाडी ।
पळती सुखः दुखेः पहुया , रामाच्या गावाला जावुया ।।

रामाचा गाव मोठा , रिद्धि-सिद्धिच्या पेठा ।
शोभा पाहून घेवुया, रामाच्या गावाला जावुया ।।

रामाची माया सुगरण, पंच महाभुतांचा करी खेळ l
परी चरणी द्रुष्टी ठेवुया, रामाच्या गावाला जावुया ।।

रामाची माया चोरटि, प्रपंच प्रसवून वांझोटी
संतांची नावे सांगुया, रामाच्या गावाला जावुया ।।

रामा मोठा तालेवार, सोडवी दुस्तर हा  सन्सार ।
श्री राम जय राम म्हणुया, रामाच्या गावाला जावुया ।।