नको विचारूस तू मला खुशाली वगैरे वगैरे

नको विचारूस तू मला खुशाली वगैरे वगैरे 
दुनिया भलतीच आहे खयाली वगैरे वगैरे 
चाळशील तू जेव्हा क्षण आठवांचे...पावसांचे
नको होऊस विरहवेडी रुदाली वगैरे वगैरे 
माणूस कसा ओळखू अता फक्त चेहऱ्याने
एक झोपडीत अन एक महाली वगैरे वगैरे
नको तुही होऊस या बुजगावण्यांचा सोयरा
उठ पेटुनी, घे हाती मशाली वगैरे वगैरे 
तशी तुझी -माझी भेट एकदाच झाली 
येती नित्य स्वप्ने मज मखमली वगैरे वगैरे