"हप्त्यांच्या पलिकडले "
हप्ते घेऊन कळले सारे हप्त्यांच्या पलिकडले ।ध्रु।
प्रथमतः ते घेतले आणिक घडू नये ते घडले ॥
अर्थ नवा पैशास मिळाला।
जन म्हणती हा असे घोटाळा॥
त्या दिवशी तर प्रथमच माझे दोन्ही हात अवघडले।ध्रु।१।
हो म्हणालो नको नकोतून ।
तरी घेतले बंद पेटीतून ॥
विना कारण व्याकुळतेतून मन माझे गडबडले ।ध्रु।२।
आठवती त्या भेटी गाठी ।
मद्यपेय लावूनी ओठी ॥
भेटीत मग या गुढ जगाचे रहस्य मज उलगडले।ध्रु।३।
अनंत खोंडे.
२१।४।२०१३.