संस्कार

(भाषा.. आगरी, मराठी)
दिल्ली आन डोंबिवली
समदीकरे बोंब होली 
एक भारताजी राजधानी तर दुसरी 
म्हाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी
समद्या जगान लाज गेली
मी रास ओशाललो
मी डोंबिवलीचा
आता कुठे तोंड लपवू
लपून ऱ्हातो तो गुनेगार
गुनेगार असून हजर होत नाही 
तो संजुबाबा
पानी न्हाई चंद्रभागेला
वारकरी गेला पुन्यस्नानाला
तवऱ्यात तो दादा कई ईचित्र बोतला
अवरा दिस बोंबलत व्हतो
आर नाव गावाचा खराब व्हतो
खराब काम करायला टैम नाइ लागत
चंगल्या कामाला जिंदगी नाइ पुरत
एक गाना तवा वाजायचा लेरिओबर
वो जवानी , जवानी नहि, जिसकी कोई 
कहानी नही ॥
निसर्ग शरीरान बदल घरवतो 
ह्यो बदल विवेकाला झाकतो 
कोनला घाबरत नाही त्यो
कनाची लाज नाही
गाबाचा कोन इचार करतो
मिनी बलात्कार नाई केला 
पन मना आठवतो,
सिनेमाचा पोस्तर बघुनशा 
मीनी लई सिनेमे बघितले
कईतरी, कोनीतरी दावरेल म्हनुनशा
निसर्ग आपला काम करतो
चंगले संस्कार, ईचार, ह्येच वाचवतात 
मानसाला इपरित वागन्यापासून
देव मनला नाइ म्हनून काइच बिघरत नाइ 
पन मनला तर , चुक करायच्या आदी
दहादा वाटतो , क पाप लागेल म्हनून
पुरचा जलम ह का नाही त्या नाई म्हाइत 
पन भोग भोगायला लगनार म्हनून
हजार इचार मनान येतान
येक कथा ऐकली व्हती, कुठे घरली माहिती नाही
आपन आपले दैवत 
शिवाजी राजांसंबंधी हाय असे मानू
रातच्याला ते ड्रेस पालटून राज्यात पाहानी करतान
आपल्या सैन्याच्या सेनापतीला ईच्यारतात
का रायगड कुठे ह?
सेनापती रागावतो, बोलतो , मी कोन हाए म्हाइत नाही
राजे बोलतान, कोन हवालदार, सिपाइ, लेफ्टनंट, जनरल
कमांडर, ब्रिगेडिअर कोन हस तु?
तो बोलतो , मी त्याच्यापेक्शा मोठा ह
राजे बोलतान, म्हंजे तु राजाचा सेनापती ह तर
आता राजे त्याला ईच्यारतान , संग मी कोन ह?
सेनापती बोलतो, आसल , शेतकरी, गावकरी ई 
राजे बोलतान न्हाइ त्याच्यापेक्शा मोठा ह म्या
सेनापती बोलतो, तु क सोताला सेनापती समजतो का क?
राजे बोलतान, त्याच्यापेक्शा मी मोठा हाव
सेनापती रास हासतो, आन बोलतो , तु क राजा हस का र?
राजे ऊत्तरतात हो मी राजाच हाव आन खरे रुप दावरतात त्याला
सेनापती ओशालतो, बोलतो, ही तलवार झ्या आन मना कापून टाका
राजे इच्यारतात का? तो बोलतो, आमच्या राजाबद्दल कोनी एक शब्द बोतला
तर समजावा त्याला मीनी तिथच मरला, आन मी त तुअचा अवरा अपमान केला
राजे बोलतात, आर येऱ्या, तुला गमावू कसा रे मी?
पन तुझी शिक्शा एकच, मी सतत तुझ्याबरोबर आहे ह्ये ईसरू नको
बघ चुक नाइ व्हनार॥
मानुस ताईत घालतो, गंडेदोरे बांधतो, जानवी, करदोडे बांधतो
ऊद्देश अबराच का सतत जानीव ऱ्हाती मानसाला देव बरोबर हाए
मंग पाप करताना हाथ कपतान, बाला
ही अंधश्रद्धा ह, मना म्हाइत ह, पन चंगला व्हत असला त बिघरला कुठ?
मुलीवर आन मुलावर संस्कार करने आवराच मार्ग दिसतो
वासना भरकायला टैम का लागतो?
मानसाला भुताच्या कथा पन आबरतात
मानसाला बॉक्शिंग पन आवरते, रक्त बघायला पन आवरते
विकृत विरीओपन आवरतान, पन जर संताना, देवांना 
नाव ठेवली नाइ तर... भयाण आयुष्यापेक्शा भाबडे आयुष्य काय बाईट?
आजकाल असंस्कारी गूंड सारे राज्य करतात 
पन आपन भक्त होऊ, देव न्हेमी भक्ताबरोबर आसतो
मंग पाप करन्याचा परस्नच न्हाइ उरत
कलियुग ह बाला..तरिबी मी हरलो बहुतेक आता
मी रस्ता शोधतो, मना जायाचे पातालाला
क सोना लागला त्या दिल्लीला आन माझ्या डोंबिवलील
( काही संदर्भ, नावसाधर्म्य, ऊल्लेख हा निव्वळ योगायोग समजावा.
भावना दुखावणे हा हेतू नाही)
अनिल रत्नाकर