भाषाः आग्री, मराठी
नाठाल माझा कोथला असावा
रक्ताललेला तो फला असावा
रेषा समांतर भांडल्या कतीबी
ऊद्देश काई वेगला असावा
जीवावरी तो भाउबी उठावा
अवरा क ला नादावला असावा
तो घालतो का दुःख्क येरझारा
नशिबान माझ्या कावला असावा
समदाच त्याचा चूकला असावा
रस्ता मनाचा मोकला असावा
जागा नसे आज वरची रिकामी
ऊडालाच रास धुरला असावा
अनिल रत्नाकर